#वकील संघटनेचे तहसीलदाराना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर वकील संघटनेचा ऊस उत्पादक शेतकर्याच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण पाठींबा असुन शेतकर्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन न्यायालयीन लढा लढण्यास आम्ही समर्थ राहू. अशी ग्वाही खानापूर संघटनेचे अध्यक्ष अँड.आय.आर.घाडी यानी सोमवारी दि.२ रोजी शेतकर्याच्या आंदोलन संदर्भात मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करून ते केंद्र तसेच राज्य सरकारकडे पाठवुन देण्याची निवेदनाव्दारे विनंती केली.
यावेळी निवेदन देताना खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.आय.आर घाडी म्हणाले की, सध्या कर्नाटक राज्यात ऊस उत्पादक शेतकरी मसाला योग्य दर, शासनाकडुन प्रोहोत्साहनपर अनुदान व साखरेच्या दराशी निगडीत योग भाव ऊसाला मिळलाच पाहिजे, यासाठी हे आंदोलन सुरू आहे.आज जीवनावश्यक वस्तूसह विविध उत्पादनाच्या किमती वाढत असताना ऊस उत्पादक शेतकर्याना मात्र गेल्या अनेक वर्षापासुन म्हणावा तसा दर मिळत नाही.असे त्यानी सांगीतले.
यावेळी वकील संघटनेने राज्य तसेच केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकर्याना जास्तीत जास्त योग्य दर मिळवुन तातडीने निर्णय घ्यावा.अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
खानापूर वकील संघटनेच्यावतीने उप तहसीलदार एस के तंगोळी याना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी उपतहसीलदार एस के तंगोळी यानी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठवुन देने याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.आय आर घाडी, अँड, केशव कळ्ळेकर, सचिव अँड.एम वाय कदम, खजीनदार अँड, जी.जी.पाटील, एम बी लंगोटी, एस एस कपलेश्वरी, एस एन भोसले, एन एम सुंगर,व्ही के गुब्बी, व्ही. एस हिरेमठ, पी वाय पाटील, एस एन लोटुलकर, एस आय पाटील, आर एन पाटील ,बी आय पाटील, एस एन रूपण आदी वकील उपस्थित होते.