#अपंग,महिला, बालकाना नाहक त्रास!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जुन्या बस स्थानका पर्यतच्या बसफेर्या गेल्या दोन वर्षापासुन बंद करण्यात आल्याने, गेल्या दोनवर्षा
पासुन अपंग व्यक्तीना, महिलाना, वृध्दाना तसेच बालकाना जांबोटी क्राॅसपासुन शिव स्मारकातील जुन्या बस स्थानका
पर्यत पायी चालक येजा करावी लागत आहे.
ही समस्या सोडण्यासाठी गेल्या वर्षभरापासुन प्रयत्न सुरू आहेत.याबाबत तालुक्याच्या आमदारांच्या सुचनेला ही खानापूर डेपो अधिकार्यानी डुंकून ही दाद दिली नाही.विविध संघसंघटनेच्या प्रतिनिधीनी ,व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदन, मोर्चा आवाज उठवुन ही दाद दिली नाही.
जुन्या बस स्थानकापर्यत बसेस येत नसल्याने प्रवाशांना पाय पीट करण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुऴे याचा विद्यार्थी , नोकर वर्ग तसेच प्रवाशी
वर्गाला एक ते दोन किलोमीटर चालत जाणे कठीण होत आहे.
रिक्षाभाडे गरीब कुटूंबाना परवडत नसल्याने पायी चालत जाणे मुष्कील होत आहे.
त्यामुळे येत्या शनिवारी दि.३१ आँक्टोबर रोजी व्यापारी संघटनेच्या वतीने बसडेपो बंद करण्याचे आवाहन केले आहे.