#आमदार, भाजप नेत्याची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण मंडळाचे प्रभारी ( विधानसभा क्षेत्र) तसेच खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती सुरेश नारायण देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने आमदारांच्याहस्ते शाल, पुष्पहार व पेढे भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार म्हणाले की, भाजपचे जेष्ठ नेते सुरेश देसाई यानी राजकरणात चांगलाच ठसा उमठविला आहे.त्यामुळेच निट्टूर ग्राम पंचायतीवर अनेक वेळा सदस्य व अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.त्यामुळे भाजपच्या तिकिटावर तालुका पंचायतीवर निवडुन येऊन सभापतीची धुरा सांभाळली आहे. विविध पत संस्थावर त्यानी चेअरमन पदाची धुरा सांभाळली.त्यामुळेच त्यानी आज बेळगाव ग्रामीण मंडळाचे प्रभारी( विधानसभा क्षेत्र) म्हणून कार्यरत आहे.भविष्य़ात त्यानी राजकरणात यशस्वि होऊ दे.
तसेच आपल्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्र कार्यातुन जनसेवेचा वसा असाच अखंड सुरू राहो. आपल्या नेतृत्व वाला नवनीवन यशाची शिखरे गाता येवोत, आपणास उत्तम आरोग्य सुख, समृध्दी दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीस भरभरून यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी भाजप राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी,माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल,भाजप युवानेते पंडित ओगले तसेच पत्रकार संघटनेच्यावतीने पिराजी कुर्हाडे यानी आपल्या भाषणातुन शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला नेरसा माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई ,भाजप नेते मारूती पाटील, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी,शंकर पाटील तसेच तालुका पत्रकार आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सत्कार प्रसंगी माजी सभापती सुरेश नारायण देसाई यानी वाढदिवसानिमित्त उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आभार पत्रकार पिराजी कुर्हाडे यानी मानले.
