खानापूरच्या क्रिडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी माध्यम स्कूलच्या खेळांडुनी नवरात्री निमित्त म्हैसूर येथे नुकताच झालेल्या दसरा नेटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.त्यामुळे खानापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यास्पर्धेत खानापूरच्या समर्थ इंग्रजी स्कूलच्या खेळांडुनी विद्यार्थीनीच्या गटातुन बेंगळुर ग्रामीण संघाच्या लढतीत सामना बरोबरीत सुटला,त्यानंतर ३१-४ अशा पध्दतीने समर्थ इंग्रजी स्कूलच्या खेळांडुनी विजय मिळविला, तर दक्षिण कन्नड बरोबर२८- १८ अशा पध्दतीने पराभव पत्करला, तर चौकिया सामन्यात बागलकोट संघावर २८-१७अशा पध्दतीने विजय मिळविला. व राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत तिसरा कृमांक पटकाविला.
विजयी खेळांडुना खानापूर समर्थ इंग्रजी स्कूलचे सचिव डाॅ.डी.ई. नाडगौडा, प्राचार्य बालकृष्ण हहलगेकर, स्कूलच्या अँडमिन सौ. दिव्या नाडगौडा व स्कूलचे संचालक. आदीचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे
त्याच्या विजयाबद्दल खानापूर तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.