#योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील पात्र शेतकर्याना पशु संगोपन खात्याच्यावतीने मोफत चारा बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे.
पशुखात्याकडुन देण्यात येणारे मिनीकट हे प्रथम येणार्या स प्रथम प्राधान्य या तत्वावर वितरीत करण्यात येणार असुन ज्या शेतकर्याना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.त्यानी लवकरात लवकर पशु कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन पशु खात्याचे सहाय्यक संचालक डाँ.एम बी दादमी यानी केले आहे .
तेव्हा शेतकर्यानी अर्जासोबत आधार कार्डाचे झेराॅक्स,जमिनीच्या उतार्याची झेराँक्स, आदी कागद पत्रासह खानापूर पशु कार्यालयाशी संपर्क साधुन जास्तीत जास्त शेतकर्यानी लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
