#माजी आम.डाॅ.निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस यांच्यावतीने बुधवारी दि १४ रोजी मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यां च्या राजीनाम्याची मागणी माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डाॅ.अंजली निंबाळकर यां च्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करत तीव्र आंदोलन करण्यात आले.
प्रारंभी खानापूरातील आंबेडकर गार्डनमधील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला.यावेळी शिवस्मारकातील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्प हार घालुन अभिवादन करून शिव स्मारक चौकातील पणजी बेळगांव महामार्गावर एक तास रास्ता- रोको करण्यात आला.
यावेळी ज्ञानेश कुमार यांच्याप्रतिमेचे दहन करण्यात आले.व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
त्यानंतर मोर्चाने तहसील
कार्यालावर घोषणा देत धडक देण्यात आली.यावेळी घोषणानी तहसील कार्यालय कार्यकर्त्यानी दणानुन सोडले.
यावेळी निवेदन देताना माजी आमदार तथा एआयसीसी सचीव डाॅ.अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की , गेल्या काही वर्षापासुन देशभरातील १३ कोटी मतदारांची नावे वगळुन त्यांचा राज्य घटनेने दिलेला मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे. त्या कृत्याला हे , मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे जबाबदार असुन यानी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनाम द्यावा.अशी मागणी केली.
यावेळी ब्लाॅक क्राॅग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले कि, केंद्रीय निवडणुक आयोगाच्या कारभारातील अनियमितता व देशभरातील कोट्यावधी मत दा रांची नावे वगळुन त्यांचा राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हिरावुन घेतला आहे.अशा मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी राजीनाम द्यावा.अशी मागणी केली.
यावेळी खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेसच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोमार याना निवेदन सादर केले.निवेदनाचा स्वीकार तहसीलदारानी करून सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई निंबाळकर,खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेसचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी,काॅग्रेस नेते सुरेश जाधव, महांतेश राऊत, सूर्यकांत कुलकर्णी, तोहित चांदनावर, महादेव कोळी, चंबना होसमणी, गुंडू टेकडी, काशीम हिट्टीहोळी, ईश्वर बोबाटे,दिपक कवठनकर, महिला नेत्या सौ.सावित्र मादार, सौ.अनिता दंडगल,सौ.दिपा पाटील,वैष्णवी पाटील,आदी काॅग्रेस पदाधिकारी व शेकडो नेते, काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
