#लक्ष्मी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मडवाळ (ता.खानापूर ) येथील ग्राम देवता लक्ष्मी मंदिरात माडीगुंजी विभाग अंतर्गत कापोली के सी ग्राम पंचायत प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रम उद्या शुक्रवारी दि.९ रोजी सकाळी ११ वाजता
आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार उपस्थित राहणार आहेत.
तालुका पातळीवरील नागरीकांच्या तक्रारी व आडचऩी समजावून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार प्रजा सेवा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले
आहे.
तेव्हा नागरीकानी या कार्य़क्रमास उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दुंडापा कोमार यानी केले आहे.