#!खानापूर प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमात
गर्लगुंजी माजी ग्रा.पं.सदस्य प्रसाद पाटील यांची निवेदनाव्दारे मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षापासुन गर्लगुंजी आणि गर्लगुंजी परिसरातील २२ खेड्यातील नागरीकांना नेमदि केंद्रा साठी जांबोटी येथे ये जा करावी लागत आहे.त्यामुळे गर्लगुंजी सह २२ खेड्यातील नागरीकाना गर्लगुंजी ते जांबोटी असा ३० किलो मीटर प्रवास करून तिकिटाला २०० रूपये खर्च करून एक दिवस वेळ वाया जात आहे.कर नाटकी राज्यातील कुठल्याच अधिकार्याला, लोकप्रतिनिधीना तसेच मंत्री महोदयाला याची कधीच परवा नव्हती.
मात्र सोमवारी दि ५ आँक्टोबर रोजी खानापूर येथील लोकमान्य भवनात प्रजा सेवा आंदोलना कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकिहोळी,आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यानी निवेदन सादर करून त्याच्याशी चर्चा केली.
यावेळी निवेदनाचा स्विकार करून पालक मंत्री सतीश जारकिहोळी यानी लागलीच जिल्हाधिकारी महम्मद रोशन याना या विषयी माहिती सांगीतली व त्वरित सर्वे करून गर्लगुंजी व परिसरातील २२ खेड्यातील जनतेला नेमदी केंद्राची सोय करून द्यावी.असा जिल्हाधिकार्याना आदेश दिला.
यावेळी जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांनी पूर्ण माहिती घेऊन करुन देण्याचे आश्वासन दिले.
त्यामुळे गेल्या कित्येक वर्षाचा जांबोटी नेमदी केंद्राचा वनवास गर्लगुंजीसह २२ खेड्यातील नागरीकाचा सुटणार आहे.
यामुळे गर्लगुंजी आणि परिसरातील २२ खेड्यातील नागरीकातुन समाधानाचे वातावरण पसरले आहे.