#खानापूर प्रजासेवा आंदोलनात पालक मंत्र्याना निवेदन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हब्बनहट्टी (ता. खानापूर ) गावच्या हद्दीत सध्या मोरम उत्खनाचे काम राजरोस चालु आहे.सदर ठिकाणच्या रस्त्यावरून केवळ १६ ते १८ टन वजन वाहतुक वाहनाना परवानंगी आहे.मात्र याभागातील रस्त्यावरून ३६ ते ४० टन वजनाचे मोरम अवजड वाहनातुन वाहतुक केली जाते.
सबंधीत पी आर डी रस्त्यावरून जास्तीत जास्त १५ ते २० टन वजनाच्या वाहनाना परवानगी असताना, या रस्त्यावरून ३५ ते ४० टन मोरम भरून वजनाच्या वाहनाची वाहतुक केली जाते.
त्यामुळे प्रमाणापेक्षा जादा माल भरून वाहनाची वाहतुक सुरूअसल्याने सबंधीत रस्त्याची दयनिय आवस्था होऊन, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेआहेत.त्यामुळे रास्ता वाहतुकीस धोके दायक झाला आहे.त्यामुळे यारस्त्यावर वरचेवर आपघात होण्याचे प्रकार घडत आहे.गावच्या सुरक्षितेचा प्रश्न उभारला आहे.
त्यामुळे हब्बनहट्टी गावाजवळील मोरम उत्खनासाठी दिलेली परवानगी,उत्खनाचे प्रमाण, क्षमते पेक्षा जादा वाहनातुन केली जाणारी वाहतुक,वाहतुकीस देण्यात आलेली परवानगी आदीची तपासणी सबंधीत खात्याच्या अधिकार्यानी करावी.
अशा मागणीचे निवेदन सोमवारी दि.५ आँक्टोंबर रोजी खानापूरातील लोकभवन सभागृहात आयोजित प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमा जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी याना देण्यात आले.
यावेळी या भागाच्या भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई व याभागातील
नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.