#शेतकर्याची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसापासुन खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील आंबोळी, कोकणवाडा,कबनाळी, बांदेकरवाडा,तसेच नेरसा ग्राम पंचायत हद्दीतील शेतकर्याच्या उसाचे प्रचंड नुकसान केले आहे.
आदीच पावसाने दडी मारल्याने पिके करपुन गेली आहेत.अशातच हत्तीनी उस पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे.त्यामुळे शेतकर्याची आगीतुन फोफाट्यात अशी अवस्था झाली आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यात हत्तीकडुन नुकसान झालेल्या उसाची गळीत हंगाम सुरू होताच लैला साखर कारखान्याने प्रथम उचल करावी.व उस नुकसान ग्रस्थ शेतकर्याना दिलासा द्यावा.
कारण साखर कारण्याचा गळीत हंगाम सुरू होताच कोणीही हत्तीकडुन नुकसान झालेल्या शेतकर्याच्या उसाचा विचार करत नाही.केवळ आपल्या मर्जीतल्या शेतकर्याचा उस चलण्याचा विचार करत असतात.त्यामुळे हत्तीनी नुकसान केलेला उसाकडे दुर्लक्ष केले जाते.त्यामुळे ऊस नुकसान ग्रस्थ शेतकरी नुकसानीतच राहतो.त्याला ना वनखात्याची नुकसान भरपाई मिळत नाही.कि, नुकसान झालेल्या ऊसाची उचल लवकर होत नाही.त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी दोन्ही बाजुनी संकटातच सापडतो.तेव्हा अशा शेतकर्याच्या उसाची उचल सर्वांच्या आदी होणे गरजेचे आहे.
तालुक्याच्या जंगल भागातील ऊसाची उचल आदी करा,विनायक मुतगेकर!
खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे.त्यामुळे तालु क्याच्या पश्चिमभागातील निलावडे,
जांबोटी,बैलुर,नेरसा,शिरोली,मणतुर्गा,
नागुर्डा,निट्टूर या सारख्या अनेक
ग्राम पंचायत हद्दीतील अनेक गावात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते.मात्र या जंगलभागात वनप्राण्याचा म्हणजेच हत्ती , गवेरेडे,जंगली डुक्कर आदी प्राण्याकडुन पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असते. तेव्हा तालुक्यात उसाच्या गळीत हंगामाला सुरूवात होताच याभागातील ऊसाच्या उचलसाठी आदी प्राधान्य द्यावे.जेणे करून शेतकरी जंगली प्राण्याच्या त्रासापासुन बचावतील.अली मागणी निलावडे ग्राम पंचायतीचे मा जी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी केली आहे.
नेरसाभागात हत्तीकडुन झालेल्या
उसाची नुकसान भरपाई झालीच नाही!
माजी ता.प.सदस्य अशोक देसाई
तालुक्याच्या नेरसा भागात गेल्यावर्षी हत्तीकडुन झालेल्या पिकाची नुकसान भरपाई झालीच नाही.त्यामुळे शेतकरी वैतागला आहे.यंदा ही नेरसा ग्राम पंचायत हद्दीतील उसाचे हत्तीकडुन प्रचंड नुकसान झाले आहे.तेव्हा साखर कारखाण्यानी हत्तीनी नुकसान केलेल्या उसाची उचल लवकर करावी.व शेतकर्याना दिलासा द्यावा.अशी मागणी केली आहे.