#बेळगांव जिल्हा मुख्य व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांच्याहस्ते!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील न्याय विभाग तसेच सार्वजनिक बांध काम खात्याच्या वतीने उभारण्यात न्यायाधीशांच्या नूतन निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
या निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा बेळगांव जिल्हा मुख्य व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांच्याहस्ते शुभहस्तेफित
कापून करण्यात आला.
प्रारंभी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील १७ न्यायालयापैकी खानापूर येथील वकिलाकडुन कोणतीही तक्रार आलेली नाही.हे येथील चांगल्या
सहकार्याचे उदाहरण असल्याचे सांगत त्यानी कौतुक केले. ऐवढेच नव्हेतर वकील आणि न्यायाधीशांच्या सहकार्यातुन नागरीकांना योग्य न्याय मिळत असल्याचे त्यानी सांगीतले.
यावेळी कार्यक्रमाला न्यायाधीश चंद्रशेखर तळवार, दानप्पा, ना.आळवंडी तसेच बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.