#”खानापूर मलप्रभा नदीघाटावर स्वच्छता!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूलच्या एन् सी सी छात्राच्या वतीने जागतीक नदी दिनाचे औचित्य साधुन खानापूर शहरातील मल प्रभा नदीकाठच्या घाटावर असलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या,फुले,केळीची पाने, जीर्ण फोटो आदी स्वच्छता करून नदीला मोकळा स्वास देऊ केला.त्यामुळेखानापूर नगरपंचायतीला स्वच्छेतेमुळे मदत ही मिळाली.
प्रारंभी एन सी सी छात्र व एन् सी सी ऑफिसर पी. पी. काशीद यानी शाळेपासून प्रभात फेरी काढली.त्यानंतर
खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर स्वच्छता केली.
यासाठी मराठा मंडळ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती राजश्रीताई नागराजू यांचे प्रोस्ताहन लाभले तसेच संस्थेचे संचालक परशूरामअण्णा गुरव व शिवाजीराव पाटिल यांच्या सदिच्छा आणि शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही . कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.