#कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!
,#म.ए. समितीचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESA) ७ व्या कडू अधिसूचनेमध्ये खानापूर तालुक्यातील ८५२ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या ६२ कंदाय गावांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी आणि ही ६२ गावे या जाचक अटींमधून संपूर्णपणे वगळण्यात यावीत या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (MES) वतीने उद्या, २५ सप्टेंबर २०२६ रोजी ठीक सकाळी १०:०० वाजता खानापूरच्या तहसीलदारांना अधिकृत आक्षेप नोंदवणारे निवेदन देण्यात येणार आहे.या संदर्भात खानापूर तालुका म. ए. समितीच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सीमावर्ती दुर्गम भागातील हजारो कुटुंबांच्या जमिनीच्या हक्कांवर गदा येणार असून रस्ते व मूलभूत पायाभूत सुविधा कायमच्या रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात संपूर्ण तालुक्याचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक, खानापूर.येथे उद्या सकाळी १० वाजता.
सदर निवेदन देण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, मध्यवर्ती व युवा समितीचे पदाधिकारी, सर्व गावांमधील समितीचे प्रमुख कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि खानापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने आपली ताकद दाखवण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आणि वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.