#जिल्हा शिक्षणाधिकार्याना देणार निवेदन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका बी.ई.ओ.अधिकार्याच्या प्रतिक्षेत मथळ्या खाली सोमवारी दि.,२१ रोजी संदेश क्रांती न्यूज मधुन बातमी प्रसिध्द होताच खानापूर युवा समितीचे अध्यक्ष तथा युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यानी मंगळवारी दि.२२ रोजी खानापूर बी ई ओ कार्यालया भेट देऊन व्यवस्थापक प्रकाश होसमनी यांच्याशी चर्चा करून या संदर्भात येत्या काही दिवसात जिल्हा शिक्षणाधिकार्याची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे सांगीतले.
खानापूर तालुका शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला तालुका म्हणून ओळख आहे.अशा तालुक्याला गेल्या दोन महिण्यापासुन बी ई ओ अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने बी ई ओ अधिकारी पद रिक्त आहे.
#एकाच अधिकार्याला दोन पदाचा भार!
खानापूर तालुक्याचे बी ई ओ, पी. रामाप्पा हे जूलै महिण्यात सेवा निवृत्त झाले.आपल्या काळात त्यानी बी ई ओ म्हणून उत्तम बीईओ म्हणून सेवा बजावली, त्याच्या सेवानिवृत्त नंतर गेल्या दोन महिण्यापासुन बी ई ओ पद रिक्त असल्याने खानापूर गट समन्वय अधिकारी मंजुनाथ हत्ती यानाच बी ई ओ पदाचा प्रभारी बीईओ म्हणून कार्यभार सांभाळावा लागत आहे.
त्यामुळेच एकाच अधिकार्याला दोन अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताना तारेवरची कसरत होत आहे. त्यातच शैक्षणिक दृष्टया तालुक्याच्या शिक्षण दर्जाकडे दुर्लक्ष होत आहे.तेव्हा खानापूर तालुक्याला कायम स्वरूपी बीईओ अधिकारी मिळणे गरजेचे आहे.
बी.ई.ओ. अधिकार्यामुळे असतो
शिक्षकावर वचक!
खानापूर तालुका हा अति जंगल मय तालुका आहे.जंगल भागातील शाळातुन शिक्षकांच्या कमतरतेमुळ शिक्षणाचा दर्जा घसरत आहे. खानापूर तालुक्यात केवळ अतिथी शिक्षकावर शाळा चालतात.अशा परिस्थितीत जर तालुक्याला कायम स्वरूपी बी ई ओ अधिकारी नसेल तर शिक्षकावर वचक राहणे कठीण आहे.
तेव्हा आमदारानी लवकरात लवकर बी ई ओ अधिकार्याच्या नेमणुकीसाठी प्रयत्न करने गरजेचे आहे.