संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कुप्पटगिरी ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र,मराठा मंडळ हायस्कूलचे निवृत्त शिक्षक व खानापूर शिवस्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तसेच म ए समितीचे समर्थक एम पी पाटील ( वय.८१) यांचे रविवारी दि.२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यानी शैक्षणिक क्षेत्रात,सामाजिक व शिव स्मारक ट्रस्टच्या माध्यमातुन महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,सुन, नातवंडे असा परिवार आहे.
बरगाव ग्राम पंचायतीच्या माजी सदस्या व. सी. ए. पद्मश्री पाटील यांचे वडील होत.
आज रविवारी दि.२० रोजी दुपारी ३ वाजता कुप्पटगिरी स्मशानभुमी ये थे अंत्यसंस्कार होणार आहेत.