#पत्रकार परिषदेत अध्यक्ष मुरलीधर पाटील यांची माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर पी एल डी बॅकेचा कारभार हा अनियमितेचा असुन, वार्षिक अहवाल छापला नसल्याचा बिनबुडाचा आरोप माजी संचालक के.एम. घाडी यानी केला असुन ते सुध्दा पाच वर्षे संचालक म्हणून काम पाहिले आहे. असा आरोप करणे त्याना सोबत नाही. हा आरोप साफ खोटा असुन बिनबुडाचा आरोप करणे म्हणजे बॅकेची बदनामी करणे होय. केवळ मागील निवडणुकीत अपयश आल्याने राजकीय हेतुने बदनामी करण्याचा हेतू आहे.
असे अध्यक्ष मुरलीधर पाटील यानी शनिवारी दि.१९ रोजी पीएलडी बॅकेच्या कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले.
पत्रकार परिषदेला संचालक व्ही एम पाटील,एस एन गुरव,एन एन पाटील,एन के.गुंजीकर,के.यू.बिच्चूनावर,एस.व्ही.
चोपडे, वाय.सी राथोड, एस एस करजगी,एस.व्ही.सडेकर, सम तालिका सौ.एल.एस. पाटील आदी उपस्थित होते.
मी१७ वर्षे संचालक तर ३ वेळा अध्यक्ष म्हणून काम केले. !
यावेळी अध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले की,मी पीएलडी बॅकेवर १७ वर्षे संचालक तर ३ वेळा अध्यक्ष म्हणून काम केले आहे.या काळात मी कुणाकडुन ही एक रूपया ही घेतलेला नाही. जर कुणी घेतलेले सिध्द केले तर माझ्या अध्यक्ष व संचालक पदाचा राजीनामा घ्यावा.असे आवाहन केले.
पी एल डी बॅकेत कर्मचार्याची कमतरता!
खानापूर पी एल डी बॅकेत आज सुध्दा कर्मचारी मोठी कमतरता आहे.केवळ ६ कर्मचार्या पैकी ५ कर्मचारी केवळ हंगामी स्वरूपात सेवा बजावतात,बॅकेत नोकर भरतीस सरकारची परवानगी नसल्याने बॅक चालविताना तारेवरची कसरत होते.
पीएलडी बॅकेच्या वार्षिक अहवालात नियमाचे पालन!
पी एल डी बॅकेची यंदाची वार्षिक सभा सोमवारी दि.२१ रोजी होत असुन ज्या सभासदाना अहवाल पाहिजे असल्यास बॅकेतुन घेऊन जावे.अहवाल देऊन सही घेऊन सभागृहात प्रवेश करावा.
असे आवाहन केले.
एवढेच नव्हेतर सर्वसाधारण सभेत सभासदाना प्रश्न अथवा समस्या असतील तर थेट सभेत विचारा, तुम्हाला योग्य उत्तर देऊ.असे आवाहन केले.