#श्री सार्वजनिक गणेश युवक मंडळाच्या वतीने आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
यडोगा ( ता.खानापूर) येथील श्री सार्वजानिक गणेश युवक मंडळाच्या वतीने आज शनिवारी दि.१९ रोजी रात्री ९ वाजता भव्य ओपन डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धाचे उदघाटन खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्याहस्ते होणार आहे.
ओपन डान्स स्पर्धेसाठी बक्षिसे अनुक्रमे ८००१रू,६००१ रू,४००१रू,३००१ रू,२००१ रू अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
गाव मर्यादीत डान्स स्पर्धेसाठी बक्षिसे अनुक्रमे १५०१रू,१००१रू,७०१ रू,५०१ रू,२५१ रू अशी बक्षिसे देण्यात य़ेणार आहेत.
तरी डान्स स्पर्धकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री सार्वजनिक गणेश युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज शनिवारी सायंकाळी ५ वाजता श्रीसत्य नारायण पुजा, तर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.