#श्री गणेश युवक मंडळ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील श्री हंडीभडंगणाथ मठाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचेवाडी ( ता.खानापूर ) गावात सन २००० साली स्थापना करण्यात आली.गेली २६ वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने सन साजरा करत आहे.
चिंचवाडीत सार्वजनिक गणेशोत्सव ९ दिवस साजरा करतात.या ९ दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
या निमित्त शनिवारी दि.१९ रोजी संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत नागरगाळी यांचा हरिपाठ होणार आहे.तर रात्री ९ ते १० वाजेपर्यत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच मनोरंदनासाठी कारलगा येथील भजनी भारूडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तेव्हा सर्व भाविक भक्तानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिचेवाडी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.