#बॅकेच्या वार्षिक सभेवर अक्षेप!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पी एल डी बॅकेत अपारदर्शकता व मनमानी कारभार असल्याचा आरोप माजी संचालक के. एम.घाडी ( करंबळ) यानी केला आहे.
ते म्हणतात बॅकेच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वर्भूमीवर सभासदांचे कायदेशीर अधिकार, हक्कावर गदा आणल्याचे त्यांचे म्हणने आहे.
दि १६ सप्टेंबर रोजी त्यानी बेळगाव जिल्ह्याच्या सहकारी संस्था उपनिबंधक व राज्य सहकारी कृषी व ग्रामीण बॅकेच्या व्यवस्थापकिय संचालकाकडे रीतसर तक्रार नोंदवुन बॅकेच्या कारभाराबदल प्रश्न चिन्ह उभारला आहे.
वार्षिक अहवाल ३१ मार्च २०२६ रोजीचा लेखापरीक्षित काले बंद, नफा,तोटा पत्रक,लेखा परीक्षकांच्या अहवालातील महत्वाच्या निरीक्षणांचा तपशील तसेच मागील वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालावर संचालक मंडळाने केलेल्या कार्यवाहीची माहिती सभासदाना देण्यात आ ले ली नाही.असा अक्षेप त्यानी केला आहे.
ते म्हणातात, कर्नाटक सहकारी संस्था नियम १९६० मधील नियम १४ एजे (४) नुसार वार्षिक सभेतील विषयांबाबत आवश्यक आर्थिक व लेखा परीक्षण विषयक माहिती सभासदाना देणे अपनेक्षित आहे.यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेमध्येही ही बाब मांडण्यात आली होती. आणि सभे पूर्वी आवश्यक कागदपत्रे देण्याचे आश्वासन अध्यक्ष व संचालक मंडळाने दिले होते.मात्र यंदाही त्याची पूर्तता झाली नाही.असा आरोप करण्यात आला आहे.सभासदाना आवश्यक माहितीशिवाय वार्षिक सभा घेणे त्याना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अधिकारापासुन वंचित ठेवण्यासारखे असल्याचे त्यानी मे हट ले आहे.
वार्षिक सर्वसाधारण पुढे ढकलण्याची मागणी!
सहकारी संस्थांच्या उपनिबंधकानी प्रकरणाची तातडीने दखल घेऊन बॅकेला सर्व आवश्यक कागदपत्रे सभासदाना उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत , नियमाचे पालन झाले नसल्यास आवश्यक कागद पत्रे उपलब्ध होईपर्यत वार्षिक सभा पुढे ढकलण्याचे निर्देश द्यावेत.तसेच आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी.अशी मागणी माजी संचालक के एम घाडी यानी केली आहे.