संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समाविष्ट करावा,कृत्रीम पावसासाठी उपाय योजना करने,शेतकर्याचे संपूर्ण कर्ज माफ करणे, आदी मागण्यासाठी काॅग्रेस नेते व शेतकरी प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसलीदार दुंडाप्पा कोमार याना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे.की, यंदा पुरेसा पाऊस न पडल्यामुळे व भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे खानापूर तालुक्यात शेतीसाठी लागणार्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
त्यामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत.त्यामुळे शेतकर्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे.जनावराना चाराव पाणी मिळणे कठीण आहे.
शेतकर्याच्या पिकाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवा.तसेच सबंधीत शेतर्यासाठी मदत अथवा नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करावी.जनावराना चारा, व पाण्यासाठी पाण्याच्या कुंड्याची व्यवस्था करावी.अशा मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी तहसीदार दुंडाप्पा कोमार यानी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना कांग्रेस ने ते , गर्लगुंजी माजी ग्राम पंचायत सदस्य शेतकरी प्रसाद पाटील, कल्लापा लोहार,नितीन कुंभार,प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
