संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हिरेमुन्नवळी( ता. खानापूर ) येथील ग्रामपंचायत इमारतीला मंगळवारी दि.१५ रोजी मध्य रात्री शाॅर्टसर्किट हो ऊन आग लागल्याची घटना आज बुधवारी दि १६ रोजी उघडकीस आली.
सदर आगीत ग्रामपंचायतीच्या पाठी मागील बाजुचे छप्पर जळुन खाक झाले.त्यात संगणक,महत्वाची कागदपत्रे,रॅक्स इंटरनेट यंत्रणा व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत ग्रामपंचायतीचे जवळ पास ५ लाखाहुन अधिक नुकसान झाल्याची माहिती पीडीओ वीरेश सज्जन यानी दिली.
घटनास्थळावरून मिऴालेली माहिती अशी कि, मंगळवारी दि.१५ रोजी नियमित काम आटोपून ग्राम पंचायत कर्मचारी कार्यालय बंद करून घरी गोले होते.मात्र मध्य रात्रीच्यावेळीसशार्ट सर्किट
होऊन कार्यालयाच्या मागील बाजुस आग लागली.मात्र रात्रीच्यावेळी कार्यालय बंद असल्याने कुणाच्या लक्षात आले नाही.
तर बुधवारी दि.१६ रोजी सकाळी ग्राम पंचायत कर्मचारी कार्यालयात हजर झाले .
लागलीच तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री व ग्राम पंचायत पी डी ओ वीरेश सज्जन याना देण्यात आली.
जुन्या इमारतीमुळे शाॅर्टसर्किट झाल्याचा आंदाज!
हिरेमुन्नवळी ग्राम पंचायतीच्या कार्यालयातुन गावातील पथदिपाचे विधुत कनेक्शन देण्यात आले होते.ही ग्राम पंचायतीची इमारत जुनी असल्याने विधुत यंत्रनेत बिघाड होऊन शाॅर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
