#रविवारच्या आठवडी बाजाराला जत्रेचेस्वरूप!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गणेश चतुर्थीच्या दुसरे दिवशी म्हणजे मंगळवारी दि.१५ सप्टेंबर रोजी ऋषीपंचमीचा सन असल्याने खानापूरजवळील हलकर्णीफाट्यावर रविवारी दि.१३ रोजी आठवड्याच्या बकरी बाजारात कोट्यावधी रूपयाची उलाढाल झाली.
बकरी खरेदीसाठी गर्लगुंजी पी सुन लोंढ्यापर्यत तर कणकुंबी पासुन इटगी पर्यतच्या अनेक गावातील नागरीकानी सकाळ पासुन हलकर्णी फाट्यावर मोठी हल्दी केली होती.त्यामुळे याभागाला जत्रेचे स्वरूप आले होते.
तर बकरी विक्रेत हे गोकाक, मुधोळ, बैलहोंगल,बेळगाव सह खानापूर तालुक्यातील उचवडे,जांबोटी, तिर्थकुडे,गवळीवाडे, नंदगड, मोदेकोप, बेकवाड, सह अनेक गावातुन मोठ्या संख्येने बकरी घेऊन विक्रीसाठी आले होते.
खानापूरच्या बकरी बाजारात ७ हजार रूपयापासुन ५० ते ६० हजार रूपया पर्यत बकर्यांंच्या किंमती दिसुन आल्या.
खानापूर तालुक्यात ऋषि पंचमी सन हा खडोपाडी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिण्यात तब्बल महिणाभर नागरीक मांसाहारी जेवनाचे सेवन केले नाही.त्यामुळे मंगळवारी दि.१५ रोजी मोठ्या आवडीने बकरी मारून मांसाहारी जेवनाचा बेत आखणार आहेत.त्यामुळेच आज खानापूरच्या बकरी बाजारात बकरी खरेदीसाठी नारीकानी गर्दी केली होती.

