#अखेरचा हात फिरवताना मुर्तीकार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील सिंगीनकोप, गर्लगुंजी, तोपिनकट्टी,निट्टूर, खानापूर शहर,नंदगड, सह अनेक गावात गणेश मुर्ती मोठ्या प्रमाणात तयार करतात.
गेल्या सहा महिण्यापासुन गणेश मुर्तीकार मुर्ती तयार करण्याच्या कामात दंग आहेत. तालुक्यातील कुंभार समाज प्रामुख्याने गणेश मुर्तीच्या कामात अग्रेसर आहेत.
कुंभार कलाकार जन्मजात मातीच्या मूर्ती करण्यात पारंगत असतात.कुंभारी व्यवसाय बरोबर गणेश मुर्ती तयार करण्यात त्यांचा चांगला हातखंडा असतो.
तालुक्यात सरास गणेश मुर्तीकार हे कुंभार समाजातील आहेत.
काही दिवसावर गणेशत्सव आला आहे.त्यामुळे गणेश मुर्तीकार रात्रंदिवस गणेशमुर्ती कामात दंग आहेत.
सिंगीनकोप (ता.खानापूर ) येथील मल्लापा कुंभार हे व्यवसायाने मोटर मेकॅनिक असले तरी त्यानी कुंभार व्यवसायातुन गणेशमुर्ती छंद जोपसला आहे.त्यानी घरगुती गणपती जवळपास १३०० ते १५०० गणेश मुर्त्या तयार केल्या आहेत.याजबरोबर त्यानी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पाच ते सात मुर्त्या तयार केल्या आहेत.
त्याच्या कुटूंबातील पत्नी, मुले, मुलगी, सर्वच जन गणेश मुर्ती तयार करण्याच्या कामात मदत करतात.
मुर्ती तयार करने,रंगकाम करने सर्वच कामात कुटूंबातील सदस्य हातभार लावतात.त्यामुळे त्याना मोठे सहकार्य लाभते.
त्याच्याकडुन बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर,देसूर, राज हंस गड,मच्छे, धामणे आदी गावात घरगुती गणेश मुर्ती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशमुर्त्या घेऊन जातात.तसेच खानापूर तालुक्यातुन अनेक गावात गणेशमुर्त्या घेऊन जातात.
गणेशमुर्तीच्या रंगाच्या किमतीत वाढ!
अलिकडे गणेश मुर्तीच्या रंगाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत.त्यामुळे गणेश मुर्तीच्या किमतीत ही वाढ झाल्याचे गणेशमुर्तीकाराचे म्हणने आहे.

