संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शिरोली ( ता. खानापूर ) येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात झालेल्या शिरोली केंद्रस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अबनाळी गावच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. प्राथमिक शाळेचे कृष्णा महेश गावकर, वेदांत रमेश गावकर, तेजस्विनी पांडुरंग वरकडकर, राधिका मष्णू लाड, अश्विनी पंडित डीगेकर तसेच शाळेचे माजी विद्यार्थी परशराम नामदेव गावकर, सानिका संदीप कोवाडकर, सानिका संतोष गावकर ( सरकारी माध्यमिक विद्यालय शिरोली ) असे एकूण अबनाळी गावच्या आठ विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रमेश कवळेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष गंगाराम गावकर, उपाध्यक्षा निता निवृत्ती गावकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
