#माजी आम.तथा एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई निंबाळकरांचा पत्रकार परिषदेत सवाल!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर यानी गेल्या तीन वर्षात तालुक्याचा काय विकास केला.असा सवाल गुरूवारी दि.१० रोजी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मी आमदार असताना सन २०१८ ते २३ या पाच वर्षात खानापूर तालुक्यातील ३५० गावापैकी १५० ते २०० गावात रस्त्याची कामे केली आहेत.परंतु आज तालुक्यातील गावातील रस्त्याची अवस्था गंभीर झाली आहे.पुन्हा तालुका विकासाच्याबाबतीत पाच वर्षे मागे गेला आहे.
गेल्या ३ वर्षात म.मं.डिग्री कालेज ते रूमेवाडी क्राॅस पर्यतचा सीमेंट काॅक्रिट रस्त्याचे काम ही पूर्ण करताना फिश मार्केट जवळील रस्त्याचे काम अर्धवट सोडले.त्याचा परिणाम शहरासह तालुक्याच्या जनतेला झाला.या रस्त्याच्या बाबत ज्या शेतकर्याचा अक्षेप होता.त्याच्याशी तोडगा काढणे गरजेचे होते.असा सवाल केला.
हत्तीकडुन पिकांचे नुकसान,शेतकर्याना काय मिळाले?
खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला तालुका या तालुक्याच्या पश्चिम भागात जांबोटी परीसरातील कबनाळी आंबोळी,कांजळे,निलावडे,
भागात हत्ती सह इतर वनप्राण्याकडुन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हत्तीनी शेतकर्याना तुडविले,घरे पाडविली,उस पिकाचे नुकसान केले,याबाबत मंत्र्याना, कृषीमंत्र्याना तसेच डी सी ना किती निवेदन दिलात, ती तालुक्याच्या जनते समोर ठेवावी,नुकसान ग्रस्त उस शेतकर्याना आपल्या साखर कारखाण्यात किती दिलासा दिला.असा सवाल केला.तसेच अलिकडे मराठी शाळांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सागंत,माझ्या आमदारकीच्या काळात सरकारी हास्पिटल, नवीन बसस्टँड,अनेक नविन शाळा,अंगण वा डी इमारती, रस्ते अशी अनेक विकास कामे केली आहेत.
परंतु गेल्या ३ वर्षात तालुक्याचा अपेक्षित विकास झालाच नाही.तर येत्या उर्वरीत काळात भाजपच्या आमदारानी विकास साधावा.मी काॅग्रेसच्या माजी आमदार या नात्याने सहकार्य करायला नेहमीच तयार आहे.
भाजपच्या आमदारानी सर्वपक्षिय बैठकीबद्दल माहितीच दिली नाही!
भाजपच्या आमदारानी सर्व पक्षिय बैठकीबाबत काॅग्रेसच्या माजी आमदार व पक्षाच्या पदाधिकार्याना माहितीच दिली नाही असा आरोप केला.
मलप्रभानदीवरील कुसमळी पाणी प्रकल्प २०२४ मध्येच माजीआमदारांच्या
काळात नव्हे!
खानापूर तालुक्यातील मलप्रभानदीवरील कुसमळी पाणी प्रकल्प सन २०२४
मध्येच मंजुर झाला.तो माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर काळात नव्हे.जनता समोर खोट बोली नका.असा दावा यावेळी केला.केवळ काॅग्रेसची बदनामी करू नका.
माझ्या काळात साडेचार हजार घराचा
लाभ मिळुन दिला ते ही भाजपचे सरकार असताना तुम्ही किती मिळवुन दिला.ती आकडे वारी सांगा.असा आरोप केला.
यावेळी पत्रकार परिषदेला ब्लाॅक क्राॅग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत,माजी अध्यक्ष महादेव कोळी,महिला काॅग्रेस अध्यक्षा सौ.सावत्री मादार,अल्पसंख्यक युवाकाॅग्रेसचे अध्य़क्ष
तोहिद चांदकन्नावर,युवा काॅग्रेस अध्यक्ष साई सुतार आदी उपस्थित होते.

