#सप्टेंबर महिण्यात ई केवायसी संधी!

संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधि
लोंढा ( ता.खानापूर )गावामध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यात पंच गॅरेंटी योजना अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी यानी रेशन दुकानाला भेट दिली होती, या दरम्यान रेशन घेण्यासाठी किती गर्दी झालेले पाहून आश्चर्य वाटतं होते, लोंढा दुकानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते कारण सर्वर नव्हते आणि तिथे वेळेवर अंगठ्याचे नमुने लागत नव्हते, त्यामुळे रेशनधारकांना ताटकळत राहावे लागत होते.
त्यावेळी मी रेशन दुकानदाराला रात्री दहा वाजेपर्यंत दुकान चालू ठेवावे असे समजावून सांगितले होते, त्यांनी पण ३० व ३० तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत रेशन धारकांचे सेवा करून रेशन वाटप केले,त्या वेळी रेशन धारकांना पुढील महिन्यात आपल्याला सप्टेंबर महिन्याचे १० तारखेच्या आसपास रेशन वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यानुसार राजवाळ ,आस्तोली, अक्राळी, वरकड, दूधवाळ ,मोहिशत,वाट्रे, मुंढवाड माचाळी ,सातनाळी ,मांजरपै ,वरकडपाटे पिंपळे ,घार्ली व इतर गावे वरील गावातील लोंढा रेशन दुकान व्याप्तीतील रेशन धारकांनी आपले रेशन घेऊन यावे व ज्यांनी ज्यांनी इ के वाय सी केलेले नाही त्यांची सुद्धा ई केवायसी सप्टेंबर संपूर्ण महिना चालू राहील, याची रेशन धारकांनी सर्वांनी नोंद घ्यावी .
लवकरात लवकर रेशन घेऊन जावे, रेशन बद्दल आपल्याला काही समस्या असेल किंवा काय त्रास असेल आम्हाला कळवा याची दखल घेतली जाईल व आपल्या काय समस्या गॅरेंटी योजना ऑफिस किंवा अध्यक्ष,व सदस्य गॅरंटी योजना कमिटी यांच्याशी संपर्क साधावे.असे आवाहन केले आहे.