संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघ बेंगलुरु राज्य घटकांच्या प्रशासकीय मंडळात खानापूर भाजपच्या नेत्या व बे लगाव जिल्हा भाजप प्रधान कार्यदर्शी सौ धनश्री सरदेसाई यांचा समावेश करण्यात आला असुन त्यांची राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सतत असणार्या कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा महासंघ राज्य प्रशासकीय अधिपत्याखाली चालतो.कर्नाटक राज्यात मराठा समाजाचे सदगूरू श्री श्री मंजुनाथ महास्वामीजी यां च्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाच्या उन्नतीसाठी राज्य स्तरीय संस्थेत सौ धनश्री सरदेसाई यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र परिषदेचे अध्यक्ष मोहन श्रीपती जाधव यानी दिले आहे.
त्यांच्या या सामाजिक व संघटनात्मक कार्याबद्दल खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
