#प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नाला यश!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील उचवडे या गावाला गेल्या पंधरा वर्षापासुन बससेवा झालीच नाही.गेेल्या पंधरा वर्षापासुन उचवडॆ गाव बससेवेच्या प्रतिक्षेत होते.
या गावाला पुन्हा बस सेवा चालू व्हावी. ,विद्यार्थ्याची व गावकऱ्यांना सोय व्हावे, या उद्देशाने भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी यांनी बेळगाव येथील केएसआरटीसी( K S R T C )डेपो मॅनेजरची भेट घेऊन बेळगाव उचवडे अशी बस सेवा सुरू व्हावी अशी विनंती करून निवेदन दिले.
या वेळी डेपो मॅनेजरने बस पुन्हा चालू करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देताना भाजपचे माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, भाजपा माजी जनरल सेक्रेटरी मारुती पाटील, संजय पाटील, बबन आल्लोळकर व इतर गावकरी उपस्थित होते.
यावेळी निवेदनाचा स्विकार करून बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी श्रीफळ वाढवुन बस चालक व वाहक ढांचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.

