संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका पंचमी गारंटी योजना अमलबजावणी बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेऊन काही अधिकाऱ्यांना आपापल्या विभागातील गॅरंटी योजनेच्या सदस्याने कामासंदर्भात सूचना केल्या आजच्या या बैठकीमध्ये गृहलक्ष्मी योजना या योजनेची माहिती देताना खानापुर तालुक्याचे सीडीपीओ विक्रम के बी व सुपरवायझर मंजुळा टोने यांनी माहिती दिल्याप्रमाणे खानापूर तालुक्यामध्ये 608 गृहलक्ष्मी योजनेचे लाभार्थी महिला यांचे निधन झाले आहे, त्यापैकी त्यांच्या घरातील सुनबाईनी आपल्या नावाने 159 महिलांनी गृहलक्ष्मीचा नवीन अर्ज घालून, घरामध्ये गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेत आहेत उर्वरित 449 महिलांच्या नावावरती बँकेमध्ये 12 लाख रुपये व पोस्ट खात्यामध्ये 4.20 लाख निधन झालेल्या महिलांच्या नावावरती जमा झालेले आहेत त्यापैकी सरकारला काही जणांच्या खात्यावरील रक्कम 2 लाख 48 हजार 800 रुपये बँकेकडून सरकारकडे परत केले आहेत, आणि बाकीच्यांच्या खात्यावरची रक्कम त्या त्या बँकेला लेटर पाठवून आम्ही सरकारला परत करण्याची विनंती केलेली आहे असे सांगितले. खानापूर तालुक्यातील सध्या लाभार्थी
63682 आहेत लाभार्थीना महिन्याला 727364000 रुपये खानापूर तालुक्यामध्ये येतात अशी संपूर्ण माहिती देण्यात आली.
शक्ती योजना या योजनेचे अधिकारी खानापूर डेपोचे नियंत्रक दुर्गावी यांनी माहिती सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये मोफत प्रवास केलेल्या महिलांचे आकडेवारी 640576 एवढी झाले असून त्यांच्या तिकिटाची रक्कम 17085246 झाले आहेत. यावेळी गॅरंटी योजनेच्या सदस्य प्रियांका गावकर यांनी चोरला बससाठी अजून किती दिवस लागणार असा प्रश्न केल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसात चोर्ला बस चालू करण्यात येईल असे दुर्गावी यांनी उत्तर दिले, कारण प्रियांका गावकर या सतत तीन वर्षापासून चोर्ला बस चालू करावी असे प्रत्येक महिन्याच्या मिटींगला त्यांनी आवर्जून प्रश्न मांडत आले आहेत, यावेळी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी सुद्धा चोर्ला बससाठी या दोन-तीन दिवसात बस न चालू झाल्यास राज्याचे गॅरेंटी योजना अध्यक्ष रेवन्ना साहेबांना कळवण्यात येईल असे नियंत्रक दुर्गाविना सांगितले आहे.
गृह ज्योती योजनेचे अधिकारी प्रवीण बरगाले यांनी माहिती दिल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याचे मोफत बिल दोन कोटी वीस लाख इतके वीज बिल माफ झाले आहे असे त्यांनी सांगितले, यावेळी गॅरंटी योजनेच्या सदस्य रुद्राप्पा पाटील यांनी माळ अंकले येथील टी सी बदली करण्यासंदर्भात विषय मांडला व ईदलहोंड शाळेजवळील माळ अंकलेला बस जाण्यासाठी तिथे एक टी सी आहे त्याला बसला माळअंकले रोडवर घेताना अडचण येत आहे त्यासाठी ती टीसी दुसऱ्या बाजूला घालून बसला अडचण येणार नाही याची दखल घ्यावी व टीसी ची जागा बदली करावी असा प्रश्न मांडला, तसेच सदस्या दीपा पाटील यांनी गृह ज्योतीचे इकेवायसी चालू आहे ती आम्हाला कोणीही कळवत नाही किंवा आम्हाला घेऊन करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यावेळी प्रवीण बरगाळे साहेबांनी सांगितले प्रत्येक विभाग ऑफिसर ना गॅरेंटी योजनेच्या सदस्यांचे नंबर पाठवून त्यांना कळविण्यात यावे असे आदेश देतो, आणि अजून तालुक्यामध्ये 6612 गृह ज्योती पुनर्रचना करण्याचे बाकी आहे असे सांगितले व सदस्य प्रकाश मादार यांनी आपला प्रश्न मांडताना बरगाळे साहेबांना विचारले गेल्या वर्षी जंगलामध्ये हत्ती या प्राण्यांना करंट लागू नये आणि प्राण्यांना लागणाऱ्या वायरा व खांबे बदली करण्यासाठी सरकारकडून 1 कोटी 20लाख इतका फंड दिला होता, त्यामध्ये 7 मीटरचे खांबे काढून 9 मीटरचे खांबे किती बसवले व या फंडातील किती खर्च केले याची माहिती येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या मीटिंगमध्ये लेखी स्वरुपात द्यावे अशी मागणी केली. व अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी तालुक्यातील येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या आत लाईटचे काय रिपेरी असेल ती लवकरात लवकर करून घ्यावी सणांमध्ये विज लाईट जाऊ नये याचे दक्षता घ्यावी असा विचार मांडला.आहार विभागाचे शिरस्तेदार शरणाप्पा बागेवाडी व फूड इन्स्पेक्टर आले नाहीत व शरणाप्पा बागेवाडी यांच्याशी फोनवर संपर्कही होऊ शकला नाही कारण त्यांनी फोन बंद ठेवला होता या योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी फोन लावून बघितले आणि कार्यदर्शी रमेश मैत्री सर यांनी सुद्धा फोन लावून बघितले, त्यांनी फोन बंद ठेवला होता, अशा या अधिकाऱ्यांच्या वरती निष्काळजीपणाचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असी नोटीस काढून पाठवावे असा सर्वानुमते विचार मांडण्यात आला, या बैठकीला गॅरेंटी योजनेचे सदस्य रुद्राप्पा पाटील, विवेक तडकोड, दीपा पाटील प्रकाश मादार प्रियांका गावकर शांताराम गुरव इसाखान पठाण जगदीश पाटील युशुफ हारगी संजय गावडे राजा कुडाळे गोविंद पाटील कार्यदर्शी तालुका पंचायत अधिकारी रमेश मैत्री उपस्थित होते.
