# पहिल्यांदाच सर्वपक्षिय तालुक्याच्या समस्यावर चर्चा! तोडग्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कुसमळीजवळील मल प्रभा नदीतुन बेळगाव भागाला पाणी योजनेचा प्रकल्प हा मागील आमदारांच्या काळात मंजुर होऊन त्याला माझ्या काळात कामाला प्रारंभ झाला आहे. अशी माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यानी सोमवारी दि. ३१ रोजी शिवस्मारकात आयोजित तालुका सर्व पक्षिय बैठकीत अध्यक्षिय भाषणात बोलताना दिली.
यावेळी व्यासपिठावर म ए समितीचे माजी आमदार दिगंबर, तहसीलदार दुंडाप्पा कोमार,समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील,शिवसेना राज्यउपाध्यक्ष के पी पाटील,माजी जि.प.सदस्य बाबूराव देसाई, जयराम देसाई, विलास बेळगावकर,लक्ष्मण बामणे,भाजप कार्य करनी सदस्य. प्रमोद कोचेरी, माजी अध्यक्ष संजय कुबल,सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक माजी उपसभापती मल्लापा मारीहाळ यानी केले.
प्रारंभी उपस्थितांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून बैठकीची सुरूवात झाली.
यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे यानी बैठकीत बोलताना म्हणाले की, खानापूर तालुक्यातील कुसमळीजवळील मलप्रभानदीवरील पाणी उपसा योजनेतुन बेळगावला पाणी पुरवठा करण्याच्या योजनेवर योग्य विचार होने गरजेचे आहे.तर दुसरीकडे मलप्रभा नदीवर बंधारे बाधुन तालुक्यासाठी पाणी पुरवठा होणे गरजेची आहे.
खानापूर शहरातील ड्रेनजचा प्रश्न मार्गी लगाने अत्यंत गरजेचे आहे. शहरा सह तालुक्यातील रस्ते, पाणी, शिक्षण या समस्या अजुन सुटल्या नाहीत.
त्यासुटण्यासाठी सर्व पक्षिय नेत्यानी प्रयत्न करने गरजेचे आहे.तालुक्यात ५ नद्या तसेच अनेक नाले आहेत.परंतु यंदा पाऊस कमी झाला आहे.तेव्हा भविष्यात पाणी टंचाई होऊ नये यासाठी बंधारे उभे करावे.असे सांगीतले.
तर अर्जुन देसाई, राजू पाटील, रणजीत पाटील यानी हलसी, नागरगाळी रस्त्याची समस्यां सांगीतली,तसेच बेकवाड,सागरा, वड्डेबैल रस्त्याची समस्या मांडली, व लवकरत रस्त्याचे काम पूर्ण करा .अ शी मागणी केली.
तर हेमाडगा रस्त्याचे पॅचवर्क करा,अशी मागणी नारायण काटगाळर यानी केली,
रमेश धबाले यानी जन स्पंदन कार्यक्रमाचे आयोजन करून गावच्या समस्या सोडवा, तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराला ऊत आला आहे.याकडे तहसीलदारानी लक्ष देने गरजेचे आहे.ग्रामपंचायतीच्या पीडीओ वर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. खताचा पुरवठा सुरळीत करा.अशी मागणी केली.
जयराम देसाई यानी खानापूर जांबोटी रस्ता अरूंध्द आहे, त्यामुळे साईड पट्टया योजना बरगाळली आहे.तेव्हा साईड पटट्या कराव्यात , हेस्काॅम खात्याकडुन समस्यांचे निवारण व्हावे.बस सेवा सुरळीत व्हावी अशी मागणी केली.
यावेळी समाज सेवक जयंत तिनेईकर यानी समस्या मांडल्या.तर यशवंत बीरजे यानी शहरी सह तालुक्यातील २३ समस्यांची यादी आमदाराना निवेदनाव्दारे दिली.बाबूराव देसाई यानी तालुक्याच्या जंगल भागातील खेड्यांच्या समस्या मांडल्या. बाळू शेलार यानी अनेक समस्यावर मत व्यक्त केले.
यावेळी मा जी आमदार दिगंबर पाटील यानी तालु क्या च्या विकासासाठी सर्व पक्षिय नेत्यानी एकत्र आल पाहिजे असे सांगुन इदलहोंड क्राॅस ते इदलहोंड गावापर्यतच केवळ अर्धा किलो मीटर रस्त्याची दुरूस्ती करावी अशी सुचना केली.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यानी सर्व पक्षिय नेत्यांच्या व नागरीकांच्या समस्या ऐकूण घेतल्या, व गेल्या तीन वर्षात २५० कोटी रूपयाची विकास खानापूर तालुक्यात झाली असुन उर्वरीत विकास कामे लवकरच करू असे सांगुन पुन्हा एकदा सर्व पक्षिय बैठक घेऊन समस्या सोडवू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी उपसभापती मल्लापा मारीहाळ यानी केले.
तर आभार अँड चेतन मणेरीकरी यानी मानले,
तालुका सर्वपक्षिय बैठकीला भाजप, म ए समिती, जे डी एस , शिवसेना आदी पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते.मात्र काॅग्रेस पक्षाच्या नेत्यानी पाठ फिरविली.

