संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील ताराराणी हाय स्कूल च्या पटांगणावर जिल्हा पंचायत व बी ईओ कार्यालयाच्यावतीने उद्या मंगळवारी दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता खानापूर प्राथमिक शाळा केंद्राच्या व खानापूर माध्यमिक शाळा झोनल लेव्हल क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक शिवाजी पाटील उपस्थित राहणार आहेत.
तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रभारी बीईओ मंजुनाथ हत्ती,अँड.चेतन मणेरीकर,
परशराम गुरव, प्रा.ए एल पाटील,क्रिडाअधिकारी सुरेखा मिरजी, बी आर पी.बी एन चिचडी,सी आर पी बसवराज बेनकट्टी आदी उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा खानापूर शहरातील शाळा मुख्याध्यापक,क्रिडा शिक्षक,व विद्यार्थ्यानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
