,विद्यार्थ्यानी घेतली शपथविधी !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद पी.यू.काॅलेजच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी समारंभ सोहळा शुक्रवारी दि.७ रोजी सकाळी ११ वाजता माणिकराव देशपांडे सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अँड.चेतन मणेरीकर उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे खानापूर तालुक्याचे आमदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी, प्राचार्य के. पी.चापगांवकर,
प्राध्यापक एस एस पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी काॅलेजचे प्राचार्य पी के चापगावकर यानी प्रास्ताविक केले.तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी पाहुण्याचा परिचय प्रा.उज्वला बाचोळकर यानी करून दिला.यावेळी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
काॅलेजच्या प्राध्यापकानी नुतन मंत्रीमंडळाला शपथ विधी देऊ केली.
बोलताना खानापूर तालुक्याचे आमदार म्हणाले की.विद्यार्थी काॅलेजला प्रवेश घेतात.त्यावेळी त्यांच्या जीवणातला महत्वाचा ठप्पा सुरू होतो.प्रौढावस्थेत ते काॅलेजच्या जगात जगत असतात. याकाळात त्यानी मन ताब्यात ठेवून योग्य दिशेन वाटचाल केली. तर ते जीवनात यशस्वी होऊ शकतात.जर याच काॅलेजच्या जीवनात भरकटत व व्यसनाच्या आहारी गोले तर जीवनात जगणे मुष्कील होते.यासाठी काॅलेजची पायरी चढताना व्यसना पासुन दुर रहा.जीद्दीने अभ्यास करून यश संपादन करा.आणि जीवनात यशस्वी व्हा.असा सल्ला दिला.व आमदार फंडातुन काॅलेजसाठी ५ लाखाचा मदत देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी अध्यक्षिय भाषणात चेअरमन अँड.चेतन मणेरीकर म्हणाले की, काॅलेज नाव उज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यानी सतत परिश्रम व जिद्द ठेवून अभ्यास केला तर यश संपादन करून काॅलेजचे नाव, तालुक्याचे नाव व आई वडीलाचे आजरामर. होईल असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता लाड यानी केले.तर आभार प्रा.एस एस पाटील यानी मानले
यावेळी संचालक मंडळ जयंत तिनेईकर, श्री कपलेश्वरी, श्री शहापूरकर तसेच ,काॅलेज मंत्री मंडळ,सदस्य
,प्राध्यापक ,कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

