#सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करा!
माजी आमदार दिगंबर पाटील
संदेश
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीचे पाणी दुसर्या तालुक्यासाठी वळवणे या प्रकल्पाचा खुलासा खानापूर तालुक्यातील जनतेसमोर सर्व पक्षीय बैठकीत करावा.जेने करून खानापूर तालुक्यातील जनतेला खरे खोटे काय आहे.याचा उलगडा होईल. व खानापूर तालुक्यातील जनतेला अंधारात न ठेवता, केवळ पावसाचे पाणी तेवढेच प्रकल्पाकडे वळविण्यात येणार असल्याचे सांगत असाल तर , त्याबाबतचे पुरावे सर्वपक्षीय बैठकीत जनतेसमोर मांडुन मलप्रभा पाणी वळवणे वादावर भुमिका मांडावी.असे मत माजी आमदार दिगंबर पाटील यानी मंगळवारी दि.४ रोजी शिवस्मारकात बोलविलेल्या खानापूर तालुका म ए समितीच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यानी केले.
यावेळी बैठकीत खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीचे पाणी दुसर्या तालुक्यात वळवण्यासह विविध विषयासबंधी चर्चा करण्यात आली.व बैठकीत संबधीत विषयावर ठराव मांडुन संबधित विभागाच्या अधिकार्याना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी बैठकीत बोलताना सरचिटणीस आबासाहेब दळवी म्हणाले कि,राज्यात काॅग्रेसचे सरकार असताना काॅग्रेसच्या मा जी आमदार अंजली निंबाळकर यानी हा मुद्दा घेऊन चर्चा करणे गरजेचे होते.मात्र सुरेश जाधव हा मुद्दा उपस्थित करतात.तेव्हा म ए समितीच्या भुमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा त्याना नैतिक अधिकार नाही. असे मत व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष म्हणाले की, खानापूर तालुक्यातुन दुसर्या तालुक्यात पाणी वळवण्याच्या मुद्दाचा प्रश्न हा केवळ समितीचा नसुन संपूर्ण तालुक्याच्या हिताचा आहे.तेव्हा समितीकडे बोट न करता राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यानी पुढाकार घेऊन सर्व पक्षीय बैठक बोलवावी असे विचार व्यक्त केले.
यावेळी बैठकीत मुरलीधर पाटील,विलास बेळगावकर, गोपाळ पाटील,पांडुरंग सावंत,जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, रमेश धबाले, राजेंद्र कुलम,मारूती गुरव,आदीनी आपले विचार मांडले.
यावेळी बैठकीला समितीचे कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.