संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या जुलै महिण्याच्या वेतन संदर्भात खानापूर ट्रेझरी कार्यालयाला खानापूर तालुका सरकारी
नोकर संघटनेचे अध्यक्ष बी.एम.येळ्ळूर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुका सरकारी प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष जे पी पाटील,संचालक एच एल करंबळकर आ दी नी खानापूर तालुका ट्रेझरी आँफिसचे अधिकारी सतीश दोडमणी यांची आज सोमवार दि.३ रोजी भेट घेऊन खानापूर बी ई ओ कार्यालयातुन दि .२९ रोजी वेळेत बील के.टू मध्ये सबमिट केलेले असे सांगताच,
ट्रेझरी आँफिसरनी ट्रेझरी डिपार्टमेंट मध्ये आरबीआयकडुन टेक्निकल इशू झाला आहे.
लवकरता लवकर सायंकाळ पर्यत सरकारी प्राथमिक शाळा शिक्षकांचे वेतन होईल असे आश्वासन अधिकार्यानी दिले.
यावेळी कित्तूर,खानापूर, हुक्केरी तालुक्याच्या समस्या होत्या.यामध्ये कित्तूर तालुक्याची समस्या सुटली असुन सायंकाळ पर्यत खानापूर तालुक्याची समस्या सुटेल अशी माहिती ट्रेजरी अधिकार्यानी खानापूर तालुका प्राथमिक शाळा संघटनेच्या पदाधिकार्याना दिली.