संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील माडीगुंजी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासुन बिबट्याची दशहत सुरूच आहे. गावच्या वेशीत ,माऊली मंदिराच्या परिसरात, बिबट्याचेे दर्शन ही होत आहे.त्यामुळे माडीगुंजी गावच्या नागरीकांतुन भितीचे वातावरण पसरले आहे.यासाठी वनखात्याकडुन बिबट्यापासुन सरक्षित राहण्यासाठी खबरदारी घ्यावी. असे वनखात्याने नागरीकाना आवाहन करत सुरक्षितेसाठी प्रयत्न केले आहेत.
लोंढा आरएफओचे माडीगुंजी नागरीकाना खबरदारीचे आवाहन!
सोमवारी दि.२७ रोजी रात्री लोंढा आर एफ ओ यांनी भेट दिली.यावेळी नागरीकाशी बोलताना ते म्हणाले की, माडीगुंजी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासुन बिबट्याची दहशत सुरू आहे. यासाठी लोकांच्या सुरक्षितेसाठी
पिंजरा लावलेला आहे.
तेव्हा माडीगुंजी परीसरातील नागरीकानी संध्याकाळी घराबाहेर पडू नये.लहान मुलाना घराबाहेर पडु देऊ नये.
वनखात्याकडुन पिजरा लावुन बिबट्याला जरबंद करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. असे आवाहन करण्यात आले.
या वेळी समाज सेवक पंकज कुट्रे
चंद्रकांत बुरूड, महेश भेकने. अल्ताफ बच्चनावर,विनायक नावगेकर,निवृत्ती अडकुरकर , गणराज भेकणे आदी उपस्थित होते.