#पावसामुळे ग्राहकांची मेळ्याव्याकडे पाठ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर हेस्काॅम कार्यालयात प्रत्येक महिण्याच्या तिसर्या शनिवारी होणार्या ग्राहक मेळाव्यात पावसामुळे ग्राहकानी पाठ फिरवल्याने शनिवारी दि १८ जुलैच्या ग्राहक बैठकीला केवळ २तक्रारी आल्या होत्या.
नंदगड (ता. खानापूर ) येथील ग्राहक वा सीम हेरेकर यानी तक्रारीत म्हटले की , मिटर बील मध्ये नावात बदल करून द्या.
तर दुसर्या तक्रारीत दारोळी (ता. खानापूर)
येथील ग्राहक विशाल काळे यानी आक्रम सक्रम योजनेतील रक्कम अद्याप मिळालेली नाही.ती मिळवुन द्यावी.अशी मागणी केली.अशा केवळ दोनच तक्रारी ग्राहक मेळाव्यात दाखल झाल्या.
खानापूर येथील हेस्काॅम कार्यालयात शनिवारी दि १८ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० यावेळीत ग्राहक मेळाव्याचे आयोजन पार पडले.
ग्राहक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी
हेस्काॅम कार्यालयाचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले उपस्थित होते.
ग्राहक मेळाव्याला सहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले,आकाऊट आँफिसर बी.ए धर्मादाय,सहाय्यक अभियंते एस सी अंगडी,लक्ष्मी रंगनाथ ,भरतेश नागपुर,नागेश देवलतकर,विराय्या चक्रीमठ,बसवराज हावळ,शिवाप्पा मुरगोड,जाविद नाईकवाडी आदी उपस्थित होते.
ग्राहक मेळाव्याचे महत्व नागरीकानी जाणून घेतले पाहिजे!
प्रत्येक महिण्याच्या तीसरे या शनिवारी हेस्काॅम कार्यालयात ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले जाते.परंतु या मेळाव्याला हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच ग्राहक उपस्थित राहतात.
मात्र महिणाभर नागरीक हेस्काॅम कार्यालयावर तक्रारी घेऊन मोर्चा काढणे, उपोषन करने सुरू असते.महिऩा भर तक्रारी करतच असतात.हेच नागरिक ग्राहक मेळाव्या दिवशी पाठ फिरवतात.तेव्हा नागरीकानी प्रत्येक महिण्याच्या तीसर्या शनिवारी ग्राहक मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन हेस्काॅम कार्यालयाच्या अभियंत्यानी केले आहे.