संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशन व बेळगाव चिल्ड्रन्स हास्पिटल यांच्या सयुंक्त विद्यामाने खानापूर येथील वनमाला हाॅल येथे डाॅक्टर डे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी. ई. नाडगौडा उपस्थित होते.
तर व्यासपिठावर बेळगाव चिल्ड्रन्स हाॅस्पिटलचे प्रसिध्द बालरोग तज्ञ डाॅ.मनोज पाटील तसेच बाल शस्त्र क्रिया तज्ञ डाॅ.बाबा हुक्केरी व तालुका डाॅक्टर एन एल कदम ,डाॅ.एस के पाटील,डाँ.सुळकर, डाँ.सुनिल पाटील, डाॅ.विनायक पाटील,डाॅ.सुनिल शेट्टी, डाॅ.सागर,डाॅ.वैभव,डाँ. नंदगडी,डाॅ.घाडी,डाॅ.वटारे आदी ५० हुन अधिक उपस्थित होते.
यावेळी डाॅ.मनोज पाटील, व डाॅ.बाबा हुक्केरी यांचा खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनच्यावतीने शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्ष डाॅ.डी.ई. नाडगौडा म्हणाले की डाॅक्टर हे समाजातील आरोग्यऱक्षक असुन रूग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगीतले. बदलत्या काळात डाॅक्टरावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, आणि सोवाभाव या मुल्यांचे महत्व अधोरेखित केले.तसेच डाॅक्टर व्यवसायाचे सामाजिक महत्व व
जाबाबदारी, याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाँ. मदन कुंभार यानी केले.
तर आभार डाँ.सागर नारके यानी मानले.
