आम.हलगेकर
संदेश क्रांती न्युज :
खानापूर प्रतिनिधी
तालुक्यात अधिकारी येतात तसे जातात.मात्र काही अधिकारी इतके कर्तव्यदक्ष अधिकारी असतात. की ते सेवानिवृत्ती नंतर सर्वाच्या या मनात घर करून राहतात.कारण त्यानी केलेल्या कामाचा तसेच त्यांच्या प्रामाणिक पणाचा ठसा सर्वाना आपलेसा करून जातो.असे अधिकारी म्हणजे खानापूर तालुक्याचे बी ई ओ पी.रामाप्पा होय. केवळ १६ महिणे बी ई ओ पदावरून काम करताना त्यानी अनेक यशस्वी उपक्रम राबविले.त्यामुळे १०वीच्या परीक्षेत पहिल्यांदाच खानापूर तालु क्यात विद्यार्थीनीने ६५० पैकी ६५० मार्क मिळवून तालुक्याचे नाव उज्वल केले.यामागे बीईओ चा सिंहाचा वाटा आहे.तसेच अतिदुर्गमभागात औरतबैल येथे तब्बल ७० वर्षानंतर शाळा सुरू करणे,पीएमश्री शाळा, केपीएस शाळा, मराठी माध्यम हाय स्कूल,हायस्कूलचे उपश्रेणीकरण अशा नवीन विकास कामाना चालना देऊन तालुक्यात शिक्षणाची गुणवत्ता उंचवण्यात त्यानी मोठे योगदान दिले.
असे गौरवद्दगार खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी बुधवारी मराठा मंडळ कन्वेंशन हाॅलमध्ये आयोजित सेवानिवृत्त बी ई ओ पी.रामाप्पा यां च्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने व फोटो पुजनाने झाली.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत बी आर सी अधिकारी मंजुनाथ हत्ती यानी केले.
तर सत्कारमुर्तीचा परिचय एस एन कम्मार यानी केला.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमुर्ती बीईओ पी रामाप्पा सपत्नीक उपस्थित होते.तर अक्षरदोसाह अधिकारी विनायक जकाती, क्रिया अधिकारी सौ सुरेखा मिरजी,महांतेश कित्तूर , राज्यसंघटाना प्रधीनकार्यदर्शी बी एम यळळूर,शिक्षक संघाचे अध्यक्ष एम आर चवलगी, प्रधान कार्यदर्शी बी बी चापगावकर,संचालक रमेश कवळेकर,एम एम पाटील,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर, टी आर पत्री,बसय्या हिरेमठ,मुख्याध्यापक के. व्ही कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेर यांच्याहस्ते बीईओ पी रामाप्पा यांचा सपत्नीक शाल,पुष्पहार व भेटवस्तू दे ऊन सत्कार केला.तर बीईओ ,बीआरसी कार्यालायाच्यावतीने तसेच विविध शाळांच्यावतीने मुख्याध्यापक सहशिक्षक आदीच्याहस्ते सत्कारमुर्तीचा शाल, पुष्पहार व भेट वस्तु दे ऊन भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना बीईओ पी रामाप्पा म्हणाले कि,मी केवळ १६ महिने बीईओ अधिकारी म्हणून खानापूर
तालुक्यात सेवा केली.दुभाषीक तालुका म्हणून ओळखणार्या खानापूर तालुक्याचे वैभव इतर दुसरीकडे कुठेच नाही.येथील मानुसकी हीच मला यशाकडे घेऊन जाणारी शक्ती मला मिळाली.त्यामुळे आमदाराच्या सहकार्यातुन तसेच माझे सहकारी व मुख्याध्यापक, शिक्षकांचे सहकार्य यामुळे मला शिक्षण क्षेत्रात विकास करण्यास संधी मिळाली.दहावीच्या परीक्षेत खानापूर तालुक्याच्या विद्यार्थीनीने राज्यात अव्वल स्थान पटकाविले,याचा मला सार्थ अभिमान आहे. ही माझ्या आयुष्यातील सुखद घटना आहे.असे मत व्यक्त केले.
यावेळी तालुक्यातील विविध शांळाचे मुख्याध्यापक, सहशिक्षक,संघटनेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
