“गणेबैल मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस एल भक्तुरी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
३२ वर्षाची शिक्षकी सेवा करत गणेबैल (ता.खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत मुख्याध्यापक पदावरून ३० जुन २०२६ रोजी सेवा निवृत्त झालो.या शिक्षकीपेक्षेतुन अनेक विद्यार्थ्याच्या जडनघडन व त्याच्या आनंदातुन केव्हा सेवानिवृत्त झालो याचे भान रा हि ले नाही.
या शिक्षकी सेवेत अनेक सुख दुखाचे अनुभव आले.असे विचार गणेबैल मराठीॆ शाळेचे मुख्याध्यापक एस एल भक्तुरी यानी आपल्या सेवानिवृत्त कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष सागर कवठणकर होते.
यावेळी ते म्हणाले की,सन १९९४ साली माझ्या शिक्षकी सेवेला वरकडपाट्ये (ता. खानापूर) या शाळेत झाली,१२ वर्षे सेवा करून तेथून हारूरी शाळेत बदली झाली.तेथे ७ वर्षे सेवा केली.यावेळी आदर्श शाळा पुरस्काराचा मान मिळाला.तेथून इदलहोंड ये थे सी आर पी अधिकारी म्हणून सेवा बजावली,त्यानंतर सिंगीनकोप, शाळेत सेवा केली.त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून काटगाळी मराठी शाळेत हजर झालो.त्यानंतर बरगाव मराठी शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली.सेवानिवृत्तीला जवळ असतानाच गणेबैल येथील उच्च मराठी शाळेत मुख्याध्यापक म्हणून हजार झालो.आणि ३० जुन रोजी सेवानिवृत्त झालो.
असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या स्वागतगीताने झाली.प्रास्ताविक सौ शैला जाधव यानी केले.
यावेळी एसडीएमसी अध्यक्ष सागर कवठणकर व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.तर सरस्वती फोटो पुजन उपाध्यक्षा सौ मनीषा मोटार यानी केले.
व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष के एच कौदलकर. प्रधान कार्यदर्शी बी बी चापगावकर,मुख्याध्यापक महेश कुंभार,एम ए भोसले , महादेव बांदीवडेकर,डी बी कुंभार,मोहन पाटील, माजी सीआरपी सौ रूपाली कोळी,मुख्याध्यापक आर बी पाटील , प्रकाश चिकदिनकोप,एस डी एम सी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिथि शिक्षक मोहन पाटील यानी केले.तर आभार सौ.ए बी देसाई यानी मानले.
