संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मतदार यादी फेरनिरीक्षण प्रक्रियेसाठी मराठी भाषेतुन अर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करत मराठी अर्ज उपलब्ध होईपर्यत संबधित विधानसभा मतदारसंघामधील फेर नि रीक्षण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बुधवारी दि १ जुलै रोजी निवेदनाव्दारे उपतहसीलदार एस के तडकोळ याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे. की,ज्या विधानसभा मतदार संघामध्ये मराठीला निवडणुक आयोगाने मान्यताप्राप्त भाषा म्हणून मान्यता दिली आहे.त्या ठिकाणी मतदार फेर नि रीक्षण प्रक्रियेसाठी केवळ कन्नड भाषेतील फाॅर्म उपलब्ध करून दिले जात आहेत.त्यामुळे मराठी भाषिक मतदाराना त्याच्या भाषेत निवडणुक प्रक्रिया समजुन घेण्यास अडचणी येत असुन त्यांच्या भाषिक अधिकारावर गदा येत आहे.
भारतीय निवडणुक आयोगाने १६ सप्टेबर २००८ रोजी जारी केले लिया निर्देशानुसार बेळगाव जिल्हातील निपाणी, चिकोडी,सदलगा,बेळगाव उत्तर,बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, खानापूर, बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण , भालकी,औराद,तसेच उत्तर कन्नड जिल्ह्यातील हल्याळ व कार वार या विधानसभा मत दार संघात मतदार यादी व निवडणुकीशी संबधीत सर्व साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देने बंधनकारक आहे.
निवडणुक आयोगाने अधिसुचित केलेल्या सर्व विधानसभा मतदारासंघासाठी मराठीतील एसआयआर गणना फार्म तातडीने उपलब्ध करून द्यावेत, तसेच मराठी फाॅर्म उपलब्ध होईपर्यत संबधित मतदारसंघातील फेर नि रीक्षण प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी केली.
यावेळी निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील,अध्यक्ष गोपाळ देसाई,कार्यदर्शी मुरलीधर पाटील,समिती नेते प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील ,पांडुरंग सावंत,अजित पाटील,रूक्माना झुंजवाडकर,शामराव पाटील,रमाकांत पाटील,यशवंत बीरजे,राजाराम देसाई,कृष्णा मनोळकर,म्हात्रू धबाले,कृष्णा कुंभार,यशवंत पाटीलआदी अनेक समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
