#क्लब अध्यक्षा सौ.कविता कणगणी व सदस्यांचा शाळेच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी १० डेस्क बेळगाव येथील रोटरी इ क्लब यांच्याकडुन भेटी दाखल देऊ केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष हुवाप्पा गुरव होते
कार्यक्रमाला बे लगाव रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा सौ.कविता कणगणी,सदस्य अनिल गुडी,अनिल कणगणी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक एस डी पाटील यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बेळगांव येथील रोटरी इ क्लब यांच्याकडुन तोपिनकट्टी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी १० डेस्क देण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन बेळगाव रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा सौ कविता कणगणी तसेच सदस्य अनिल कणगणी व अनिल गुडी यांचा शाल, पुष्पहार,घालुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला एस डी एम सी सदस्य परशराम गुरव, संजय मादार,मल्लेशी तिरवीर, भीमसेन करंबळकर,निवृत्त शिक्षक एम ए खांबले,तसेच सौ.वैशाली काशीद,सौ.तेजस्विनी कुंभार,सौ.एस आर पाटील,विठ्ठल हंचिमन्नी आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पिराजी पाखरे यानी मानले.
