#एसीएफ बसवराज वाळद,आरएफओ नदाफ यांचे योग्य मार्गदर्शन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हेम्माडगा (ता.खानापूर ) परीसरातील घनदाट जंगलात हेम्माडग्याचा गुराखी कमरे चार ता ना वाट चुकून जंगलात बे पत्ता झाला.बेपत्ता गुराख्याचा शोध वनविभागाने तब्बल दहा तासाच्या अथक प्रयत्नाने लावला.भीमगडाच्या जंग सात रात्रभर सुरू असलेल्या वनकर्मचार्याच्या धाडसी मोहिमेमुळे गुराख्याचा शोध लागुन त्याचे प्राण ही वाचले.या प्रसंगाने वनाधिकारी व वनकर्मचार्याचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
या बाबत खानापूर एसीएफ बसवराज वाळद यांच्याकडुन मिळालेली मा हि दी अशी की , हेम्माडगा गावचे गुराखी हेमंत मादार ( वय.६५) हे नेहमी प्रमाणे गुरे चारण्यासाठी हेम्माडग्याच्या जंगलात गेले होते.मात्र सायंकाळी गुरे घरी परतली.मात्र हेमंत मादार परतलेच नाही, त्याचा मागमुस लागलाच नाही.त्यामुळे घाबरलेल्या मादार कुटूंबाने तसेच ग्रामस्थानी लागलीच भीमगड वन्यजीव विभागाशी संपर्क साधला.
घटनेची मा हि ती मिळताच भीमगड वन्यजीव विभागाचे आरएपओ श्री .नदाफ यानी लागलीच हालचाली सुरू केल्या.खानापूर एसीएफ बसवराज वाळद यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचार्याची व ग्रामस्थाची पाच विशेष पथके तयार करण्यात आली.
हेम्माडग्याच्या दाट जंगल आणि हिंस्त्र श्र्वापदाचा वावर अशा जंगलात रात्री आठ वाजल्यापासुन दुसर्या दिवशी पहाटे सहा वाजेपर्यत सलग दहा तास शोधमोहिम राबविण्यात आली.अखेर सर्वाच्या अथक प्रयत्नाने हेमंत मादार याचा शोध घेण्यात पथकाला यश आले.त्यानंतर त्याना सुरक्षितपणे जंगलातुन बाहेर काढुन कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
वनविभागाच्या धाडशी कार्यामुळे खानापूर तालुक्यातुन वनविभागाचे कौतुक होत आहे.

