#इयत्ता पहली ते पाचवी पर्यत २५ विद्यार्थी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति दुर्गम मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो.त्यामुळेच गेली ७८ वर्षे खानापूर तालुक्याच्या जंगलभागातील बाळगुंद गावाजवळील औरतबैल( गवळीवाडा) येथे शाळेचा पत्ता नव्हता.
मात्र नवीन आलेले बीईओ पी. रामाप्पा यानी खानापूर तालुक्याच्या जंगल
भागातील बाळगुंद गावाजवळील औरतबैल
( गवळीवाडा) ये थे इयत्ता पहली ते पांचवी पर्यतच्या वर्गाची सुरूवात करून जवळ पास २५ विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल केले.
या औरतबैल (गवळीवाडा) ये थे खानापूर तालुक्याचे आमदार यांच्याहस्ते नविन शाळेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी बीईओ पी.रामाप्पा , शिक्षणप्रेमी, नागरीक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरतबैल(गवळीवाडा) येथील चिमुरड्या मुलाना गेल्या कित्येक वर्षापासुन शिक्षणासाठी उन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता शिक्षणासाठी वनवास भोगावा लागला.
आज यामुलाना शिक्षणाची सोय झाल्याने चेहर्यावर आनंदाचे हसु पसरले.
यामुळे बीईओ ,खानापूरचे आमदार याचे कौतुक होत आहे.

