#जमीन अधिग्रहण नोटीसला शेतकऱ्यांचे उत्तर !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्ग सुपीक जमिनीतून जात असल्यामुळे शेतकरी गेली ७ वर्ष या प्रोजेक्ट ला विरोध करत आहेत.तुम्ही शेतकऱ्यांनी सुचविलेल्या नापीक जमिनी अधिग्रहण करा .आपण सुपीक जमिनी कदापि देणार नाही.कारण या जमिनीतून आपण वर्षातून तीन पीक भाजीपाला उत्पन्न घेतो आणि या शिवारात फक्त ५०ते ८०फुटावर भरपूर पाणी असलेल्या शेकडो बोअरवेल आहेत.आपल्याला ह्या जमिनी जीवन जगण्याचं साधन आहेत त्याचबरोबर रेल्वे मार्ग झाला तर वीज लाइन चा,जनावरांचा, ट्रॅक्टर पास करणे आणि पाईप लाईन असे मोठे प्रश्न निर्माण होणार आहेत .राजकीय दबावाला बळी पडून त्यांच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना मारू नका अशी विनंती प्रसाद पाटील यांनी मंजुनाथ डोंबर भूअधिग्रहण अधिकाऱ्यांना केली.यावेळी शेतकरी प्रसाद पाटील,सुनील पाटील,संतोष पाटील, मारुती लोकूर,किरण लोंढे, राजेंद्र पाटील,पुंडलिक मेलगे, सुरेश जाधव,कृष्णा सिद्धानी,सुधाकर पाटील यांच्या सह गर्लगुंजी, नंदीहाळी, के के कोप, हलगीमर्डी,नागेनहाट्टी गावातील दोनशेहुन अधिक शेतकरी उपस्थित होते.
मंजुनाथ डोंबर विशेष भूअधिग्रहण अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले आणि सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन दिले.

