#गेल्या कित्येक वर्षापासुन कुपनलिकाच नाही,पाण्याची समस्या!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पशु खात्याच्या कार्यालयाला आजतागायत कुपनलिकाच नाही.त्यामुळे पाण्याविना समस्याना तोंड देण्याची वेळ पशु खात्याच्या कार्यालयातील कर्मचार्याना आली आहे.
केवळ नगरपंचायतीच्या नळपाणी पुरवठ्यावर कार्यलयीन कामकाज आवलंबुन आहे.
मे महिण्यात अपूरा पाणी पुरवठा!
सध्या मलप्रभा नदी ने तळ गाठला आहे.त्यामुळे शहरातील मल प्रभा नदीचा पाणी अत्यल्प होत आहे.त्याचा परिणाम येथील पशु खात्याच्या कार्यालयावर होत आहे.पशु खात्याचा जनावरांचा दवाखाना असल्याने पाण्याचा वापर जास्त होतो.
परंतु अलिकडे पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने खानापूर पशु खात्याच्या कार्यालयाला कुपनलिकेची गरज आहे.
तेव्हा खानापूर च्या आमदारानी पशु खात्याच्या कार्यालयाच्या आवारात लवकरात लवकर कुपनलिकेची सोय करावी.अशी मागणी होत आहे.
