संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
माणसाला शांतता, भक्ती हवी असेल तर मंदिर ही असलीच पाहिजेत,जिथं मंदिर तिथं शांती आणि भक्ती असते. त्यामुळे दुर्गानगरात श्रीसाईबाबा मंदिराची उभारणी करण्यात आली.
या मंदिरात भाविकानी भक्तीचा आनंद लुटावा असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यानी गुरूवारी खानापूर शहरातील दुर्गानगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृत पाटील होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,या मंदिरासाठी आमदार फंडातुन ५ लाखाचा निजी मंजुर करून मंदिराच्या विकासकामाना चालणार मिळणार आहे.
तसेच ग्रामस्थांच्या श्रद्धेचे आणि एकजुटीचे कौतुक केले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा राज्य कार्यकारी सदस्य प्रमोद कोचेरी, जिल्हा उपाध्यायक्ष संजय कुबल, सेक्रेटरी गुंडू तोपीनकट्टी,. भरमाणी पाटील, खानापूर रेल्वे निरीक्षक व भाजप नेते राजू रायका,माजी जि.प.सदस्य बाबूराव देसाई, म.ए.समितीचे सचिव आबासाहेब दळवी, माजी नगरसेविका सौ.लता पाटील,सौ.मेघा कुंदरगी, एलन बोर्झीस यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्य रांची या हल्के दिन प्रज्वलन व विविध फोटोचे विजन करण्यात आले.
या वे ली आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते फित कापून मंदिराचे उदघाटन केले.
तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात मंगळवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी होम-हवन व विविध धार्मिक विधी पार पडल्या.तर गुरुवारी सकाळी कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.
सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली.


