#खानापूरात मोठा पाऊस झालाच नाही!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सततचा उकाडा,उन्हाच्या झळा,त्यामुळे सर्वाचा जीव कासाविस होत असताना गेल्या कित्येक दिवसा पासुन मोठ्य़ा पावसाची हजेरी झालीच नाही.त्यामुळे खानापूर शहरवासीय व परीसरातील नागरिक मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत. असतानाच सोमवारी दि. ११ रोजी पावसाने हुलकावणी दिली.
सोमवारी सकाळपासुनच हवेत उष्मा होता.दिवसभर रखरखत्या उन्हामुळे जीव कासाविस होत होता. सायंकाळी आकाशात जग जमले, काही वेळ वारासुटला वीजा ही गडगडल्या, मोटा पाऊस पडणार असा अंदाज असताना पावसाने हुलकावणी दिली.
खानापूर शहरासह परिसरात अद्याप मोठा पाऊस झालाच नाही. त्यामुळे सर्वजन मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
मलप्रभा नदीने तळ गाठला!
गेल्या कित्येक दिवसापासुन खानापूरासह परीसरात मोठा पाऊस झालाच नाही. त्यामुळे मलप्रभा नदीत पाण्याचा साठाच झालाच नाही.त्यातच कडक उन्हामुळे मलप्रभा नदीने तळ गाठला.त्यामुळे पाणी समस्या उदभवत आहे.

