#शुक्रवार पर्यत यात्रोत्सव!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गावचे ग्राम दैवत श्रीमाऊली देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदा मंगळवारी दि.२८ एप्रिल पासुन प्रारंभ होत आहे.ही यात्रा शुक्रवारी दि.१ मे पर्यत चालणार आहे.
आज मंगळवारी दि.२८ रोजी सकाळी गावातील विविध देवदेवतांची विधिवत पुजा होऊन दुपारी ३ वाजता गावातुन देवीची पालखी व मुखवटे माऊली मंदिराकडे वाद्याच्या नादात प्रस्थान होऊन माऊली मंदिरात देवीला गार्हाणे घालुन सायंकाळी यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे.
बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस!
उद्या बुधवारी दि.२९ रोजी पहाटे सुवासिनीसह आरतीचे प्रस्थान माऊली मंदिराकडे होईल.त्यानंतर इंगळ्याना प्रारंभ होऊन महाप्रसादाला सुरूवात होणार आहे.
बुधवारी रात्री गावात मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहे. गुरूवारी दि.३० रोजी रात्री यात्रेनिमित्त गावात मनोरंनाचे कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवारी दि.१ मे रोजी यात्रेचा शेवटचा दिवस यावेळी सायंकाळी ५ वाजता माऊली मंदीरात आरती होऊन पालखी व देवीच्या मुखवट्यांचे गावकडे प्रस्थान होईल.
