#अधिकारी ए.सी. रूममध्ये बसुन शिक्षकावर आणतात दबाव!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
परीक्षा संपवुन निकाल लागताच शिक्षकाना जनगणतीच्या कामाना जुंपले असुन ऐन सुट्टीच्या काळात डोक्यावर कडक उन्हाचा मार सहन करत गावोगावी दारोदारी फिरत शिक्षकाना जनगणती करताना शिक्षकावर मानसिक ताण निर्माण झाला असुन शिक्षक जेरीस आले आहेत.त्यातच त्याच्या ऊन्हाळी सुट्टीवर ही गदा आली आहे.
उन्हाळ्यात एप्रिल महिणा हा शिक्षकांच्या दृष्टीने सुट्टीचा महिणा असतो.याच महिण्यात शिक्षकावर विविध कामाचा ताण वाढला आहे.तर दुसरीकडे अधिकारी ए.सी. रूम मध्ये बसुन कामाचा दबाव टाकत असल्याची चर्चा सुरू आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार काम हे अशैक्षणिक काम म्हणून वर्गीकृत केले आहे.अशा अशैक्षणिक कामामुळे शिक्षकाना माणसिक त्रास सहन करावा लागत आहे.त्याच बरोबर विद्यार्थ्याचे ही शैक्षणिक नुकसान होत आहे.तेव्हा अशा कामापासुन शिक्षकाना दुर ठेवा.अशी मागणी शिक्षक संघटनेकडुन वारंवार होत आहे.तरी ही शिक्षकाना अशा कामाना जुंपले जाते आहे.
एकिकडे भर उन्हात शिक्षक डोकीवर टोपी,छत्र्या वापरत प्रामाणिकपणे हे काम करत आहेत.तर नकाशानुसार शिक्षकाना गावोगावी, अनेक गल्लोगल्ली भर उन्हात
फिरून गणतीचे काम करताना दमछाक होत आहे.याचशिवाय याच महिण्यात विविध प्रकारचे ट्रेनिंग सुध्दा शिक्षकानाच दिले जात आहे.त्यामुळे शिक्षक ही कामे करताना मेटाकुटीस आला आहे.
शिक्षकांची प्रतिक्रिया
जनगणतीची कामे ही शिक्षका ऐवजी बेरोजगार पदवीधर सुशिक्षित युवकाना दिले. तर त्याना काम मिळेल,भत्ताही मिळेल,परंंतु सरकारने कोणताही विचार न करता थेट शिक्षकाना कामाला झुंपले.भविष्यात तरी बेरोजगार पदवीधर युवकाना अशी कामा द्या. अशी मागणी शिक्षकातुन होत आहे.

