#निवेदनावंदारे मागणी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
ऐन पावसाळ्यात बरेच वेळा रिपेअर कामासाठी वीज काढली जाते .आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.त्यासाठी पावसाळ्यापूर्वी विद्युत ताराना लागणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि इतर अडचणी च्या ठिकाणचे पार्ट बदलने ही सर्व कामे आताच करून घ्यावी.
जेणेकरून पावसाळ्यात लोकांना अंधारात रहान्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.
तसेच गर्लगुंजी श्री माऊली देवी यात्रा काळात वीज सुरळीत ठेवा. त्यासाठी कायमस्वरूपी लाइनमन गावात ठेवावा.अशा स्वरूपाचे निवेदन सहायक कार्यकारी अभियंता प्रविण बरगाळे याना देण्यात आले. गर्लगुंजी भागाचे पूर्वीचे सेक्शन ऑफिसर जावेद यानाच पूर्वीप्रमाणे गर्लगुंजी भागाची जबाबदारी द्यावी अशी ही विनंती यावेळी करण्यात आली.
या सर्व मागण्या मान्य करून उपाययोजना चालू करू असे हेस्कॉम सहायक कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्त प्रसाद पाटील,विजय लोहार, परशराम बेळगावकर,सतीश बुरुड,रामचंद्र लोहार उपस्थित होते.

